STORYMIRROR

Nutan Pattil

Romance

4  

Nutan Pattil

Romance

गाली गुलाब फुलला

गाली गुलाब फुलला

1 min
165

तुला पाहुनच जीव वेडावला

आज प्रिया गाली गुलाब फुलला


आठवण तुझी निरंतर येते

स्वप्न तुझे सख्या मी रोज पहाते


तुझी प्रियतमा सखी मी चांदणी

आतुरले मिलनास मी मोहिनी


साथ हवी मला तुझीच नेहमी

वाट पाहिली नेहमी जन्मोजन्मी


प्रीत ही नवीन जीवनात हवी

राधा मी तुझी प्रेमात नवनवी


मन व्याकुळ माझे तुझ्याचसाठी

बांधू जन्मोजन्मीच्या रेशीमगाठी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance