STORYMIRROR

Swapna Sadhankar

Tragedy

3  

Swapna Sadhankar

Tragedy

एकान्त

एकान्त

1 min
241

घरात एकटेच होते

थोड़ी सवडच होती म्हणा

काय करावे विचारात होते

तेच म्युझिक प्लेयर वर नजर गेली

खूप दिवस झाले होते

धूळ साफ करायलाच हात लागतोय

उगाचच न्याहळत होते

मग रिमोट हातात घेतला

एफ एम सुरु केले

अन् बँड बदलायला लागले

ओळखीचं गाणं होतं

तेवढ्यात थांबले

कानावर शब्द उमटले

' जी में आता है

तेरे दामन में

सर छुपाके हम

रोतें रहें, रोतें रहें .......'

कुठल्या विश्वात शिरले

का कोण जाणे

ढसाढसा रडू फूटले

पण पुसायला दामन कुठे होते.......

आसवांसोबत वाहत सुटले

तर गाणं दूर निघून गेलं

लगेच विचार आवरले

गाण्यावर केंद्रित केले

' तेरे बिना जिंदगी से कोई

शिकवा तो नहीं, शिकवा नहीं

शिकवा नहीं, शिकवा नहीं.......'

संगीताची जादू चालली

पुन्हा विचारांचं चक्र वळलच

"तुझ्याशिवाय आयुष्य ते

आयुष्य कुठे उरतं

जगण्याची ही तक्रार सांगावी

असं तुझ्याशिवाय कोण पुरतं......."


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy