एक नवी पहाट
एक नवी पहाट
ऐकुनी पक्ष्यांची किलबिलाट,
उजळते स्वप्नांची नवी पहाट.
ठेवूनी मनात नवी आस,
नवा उपक्रम, नवा ध्यास.
प्रत्येकाचा असतो वेगळा प्रवास,
तोच करवितो आयुष्याची सफर खास.
ठेवूनी दूरदृष्टी ,
सोडवाव्यात रोजच्या गोष्टी/कटकटी.
ज्या गोष्टी पटतात, तिथे द्यावे लक्ष,
बाकी गोंधळाकडे करावे दुर्लक्ष.
सद्यपरिस्थितीचा करावा स्वीकार,
त्यातच दडले आहे जीवनाचे सार.
खूप महत्त्वाचे असते योग्य व्यक्ती बनणे,
सोडूनी इतरांचे उणे-दुणे.
स्वतःच बनायची असते स्वतःची ढाल,
करूनी सर्वस्व बहाल.
प्रत्येक दिवशी असतो एक वेगळा लढा,
यातून मार्ग मात्र नक्की काढा.
