STORYMIRROR

Sambodhi Gangurde

Children

5.0  

Sambodhi Gangurde

Children

एक होता भोपळा

एक होता भोपळा

1 min
15.2K


एक होता भोपळा

वेलीवर जाऊन झोपला

झाला विजेचा कडकडाट

भोपळे महाराज पळाले सुसाट

आला सोसाट्याचा वारा

भोपळा घेई झाडाचा सहारा

पाहून भोपळ्याची घाई

झाडालाही सुचले मजेशीर काही

बोलले भोपळे दादा

आता मोठे येईल वादळ

होईल साऱ्या भाज्यांची पळापळ

तू कर एक काम

हो माझ्या वर विराजमान

ऐकून झाडाची बात

भोपळा जाई शेंड्यावर जोरात

शेंडा लागला गदागदा हलू

भोपळ्याची झाली कसरत सुरू

जोराचा वारा झाडाला आदळला

भोपळा धुपकां खालीच पडला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children