बालपण
बालपण
1 min
170
कसे होते बालपण
कट्टी बट्टी चालतसे
खेळ खेळूनी मैदानी
थकवा तो जातअसे...१
मजा येई जगण्यात
नाही समज कसली
उचापती करताना
सर्व पोरे ती हसली..2
आई बाबांचे लाडके
भांडतसे कसे बसे
सोडुनिया भांडण ते
मुले शहाणे ते दिसें..3
पुन्हा यावे ते दिवस
नाचू गाऊ मस्ती करू
परतावे बालपण
एकमेका हात धरू..४
