लेक
लेक
लेक म्हणजे काय असते
आई सारखी दुसरी माय असते
आई जन्माला पुरत असते
म्हणून एक लेक हवी असते!
एक दिवस तिला सासरी जायच असतं
परक घरं ही आपलंस करायच असतं
आपल्याच संस्काराचा वारसा ती पुढे
चालवतं असते
मी तीच व ती माझं माहेर जपत असते
आणि म्हणूनच
एक तरी लेक नक्कीच हवी असते !!
