बाळ
बाळ
1 min
194
सुंदर ते
गोड बाळ
पाडतसे
तोंडी लाळ..१
हाती त्याच्या
गोल तोडी
खेळतसे
होडी होडी..2
पायी त्याच्या
गोल वाळे
अंगणात
बाळ खेळे..3
घुटावरी
रांग तसें
बाळकृष्ण
जसे दिसें..४
ओठ त्याचे
लाल लाल
गबू गबू
दिसें गाल..५
डोळे कसे
घारे घारे
बोलतसे
हरे हरे..६
