माझ्या बाळासाठी
माझ्या बाळासाठी
1 min
265
तुझ्यासाठीच जगते
तुझ्यासाठी कष्ट करते
जीवाचा येवढा आटापिटा
सोन्या तुझ्यासाठीच करते |
तू आहेस म्हणून
जीवन जगावेसे वाटते
तुझ्या भावी आयुष्यासाठीस
आज दुनियेशी झगडते |
देवाकडे एकाच मागणे
माझ्या बाळाला सुख दे
त्याचे दुःख मला देऊन
माझे उदंड आयुष्य त्याला दे |
