एक एक दिवस जाताेय
एक एक दिवस जाताेय
एक एक दिवस जाताेय,जवळ मृत्यूच्या दाढेत
किती काटे पेरावे,आपणच आपल्या वाटेत
एक एक दिवस जाताेय,ध्येयाविना जगण्याचा
मिळावे सर्व आपणास, हव्यास काय कामाचा
एक एक दिवस जाताेय,वय वाढत जाते
वयानुसार व्हावा बदल,भूतकाळाकडे नजर असते
एक एक दिवस जाताेय,हाेत नाही काही प्रगती
चाकही बसतं अडून, मिळत नाही अपेक्षित गती
