STORYMIRROR

शिवांगी पाटणकर

Romance Tragedy

4  

शिवांगी पाटणकर

Romance Tragedy

एक आठवण वेडावणारी

एक आठवण वेडावणारी

1 min
196

नव्हतं वाटलं रे तू

एवढा बदलून जाशील

एक आस होती मनाला

तू परत कधीतरी येशील


वाटतं होतं मला होईल

कधीतरी नीट सगळं

पण तुझ्या मनातच

आहे काहीतरी वेगळं


जायचंच होतं तुला

तर का आलास परत

का दाखवलीस आस

जर ठेवायचं होतं रडत


माझ्या या मनाला 

का वेडी आस लावलीस

आपल्या सुखी आयुष्याची 

स्वप्न का दाखवलीस



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance