Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Urmi Hemashree Gharat

Classics Children

2  

Urmi Hemashree Gharat

Classics Children

ए आजी.....

ए आजी.....

1 min
9.3K


ए आजी....

 

ए आजी आठवतयं का तुला?

तु लहानपणी माझ्यासाठी बांधलेला झुला

कोणी कितीही ओरडलं तरी

पाठीशी घालायचीस तु मला ||१||

ए आजी आठवतयं का तुला ?

तु भरवायचीस मला तुपाची भाकरी

कारण आई बाबा माझे

करायचे दिवसभर नोकरी||२||

ए आजी आठवतयं का तुला?

तु शिवला होता माझ्यासाठी सदरा

शाळेतुन येता येता पुरवायचीस 

तु माझा हट्ट लडीवाळा||३||

ए आजी आठवतयं का तुला ?

आपण दिवाळीत बांधलेला किल्ला

तु केलेल्या खमंग फराळसोेबत

आम्हा सर्वांचा मनमुराद हल्ला||४||

ए आजी आठवतयं का तुला ?

बघ मला सारं आठवतयं

तु आज सोबत नसली तरी

तुझं असणं जाणवतयं मला||५||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics