दुधारी
दुधारी
दुधारी लेखणी,
गाजली भिमाची
नीधन भिमाआईचे;
पोरख झाल लेकरू
घडविले पित्याने;
मडविले आत्याने
कसविले मनाला;
शिकवीले दुनियादारी ने
हिनतेत तापले;
चटके वेदनां चे
पायदळी तुडविले;
कसरत जिवनाची
प्राण पणाला लावले;
शिक्षणासाठी
ऊजाडला दिन;
रामु गावली
दुधारी लेखणी;
गाजली भिमाची
थाटला संसार;
ओझे समाजाचे
पेलवेणा जबाबदारी;
कासाविस मण दैना जिवाची
व्यथा सांगावी किती
प्रिती प्रेमाची
आगमण चिमुकल्याचे
खुशी अंतर मणात;
दु;ख क्षणाचे
आजाराचे आगणम;
मुत्यु चे तांडव
व्याकुळ मण
साथ सोडती आपत जण
भयान परिस्थिती;
कालाकाल सयोगाची
विसरून सारे काही;
समरस वेळेसी
निश्चयकेला पक्का;
आक्रोशाने व्येथीत जनता
दु:खी पिडीतासाठी अर्पावे जीवन
सार्थकी लागले कार्य तयाचे
झाली कायापालट;
ऊदारीले जनजीवन
लमेलेल्यांना दिले खतपाणी
ऊफळुन आली क्रांती;
स्वयम प्रकाशीत
झाले जनजीवन
हतबलांना केले बलवान;
पेनाच्या टोकावर
वाजला डंका झाली गर्जना;
बौध्द धम्माची
