STORYMIRROR

शशिकांत राऊत

Classics

3  

शशिकांत राऊत

Classics

*दसरा *

*दसरा *

1 min
396

साडेतीन मुहूर्तांचा,

सण दसऱ्याचा आला...

तोचि विजयादशमी,

शुभ कार्य करण्याला...


पाटीवर रेखाटूनी,

प्रतिमेत शारदेला...

पुजा करीती विद्यार्थी,

दसऱ्याच्या दिवसाला...


आपुलकी भेटीसाठी,

असे महत्व पानाला...

तोचि सुवर्णाचा मान, 

शमी अन् आपट्याला...


पिक शेताचे पहिले,

येता प्रारंभी घराला...

बळीराजा सुखासाठी,

करी अर्पण देवाला...


असे परंपरा रूढी,

शस्त्र, अस्त्रे पुजनाला...

राजे क्षत्रिय पूर्वीचे,

जाती पुजूनी युध्दाला...


वास्तु, वस्तु नवं सारं,

शुभ असे खरेदीला...

पुजा अर्चा देवतांची,

भक्तिभावे दसऱ्याला...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics