STORYMIRROR

Archana ansurkar

Children

3  

Archana ansurkar

Children

दप्तर

दप्तर

1 min
478

शाळेचे दप्तर माझे

माझ्याशी बोलू लागले,

शाळेत मला घेऊन चल

अशी मनधरणी करू लागले ||


म्हणे उचलेन आनंदाने तुझ्या

वह्‌या-पुस्तकांचा भार,

सहन करेन गर्दी, धक्के

अन्‌ पावसाची धार ||


कंटाळलो अडगळीत बसून 

पडलो आहे धुळीत फार,

पाठीवर घेऊन मला

शाळेत कधी नेणार?


आठवण येत होती त्यास 

आईच्या रूचकर डब्याची,

हस्तकला, चित्रकलेच्या

नवनवीन साहित्याची || 


म्हणाले तक्रारीच्या सूरात मला 

घरात किटले माझे कान,

चल ना शाळेत पुन्हा 

मित्रांच्या घोळक्यातच वाटते छान ||


Rate this content
Log in

More marathi poem from Archana ansurkar

Similar marathi poem from Children