दिस आगळे प्रेमाचे
दिस आगळे प्रेमाचे
रोजचेचं चालू होते गाणे
तेच तेच ते कंटाळवाणे
सुखदुःखाचे चढउतार आणिक
ओंगळवाणे, शिणलेले जिणे....
होता खुशाल रममाण जीव हा
जगवतील एवढे होते दाणे
चाहूल लागली कोठून नवीशी
मंद प्रकाशात सारे दिसू लागले .....
स्वप्न की साखरझोप कळेना
मनपक्षी आकाशी उडू लागले ..
धूसर झाले बाह्यनगर हे
अंतरात मन बुडू लागले ...
ओढ लागली प्रिया तुझी रे
कल्पनातीत सारे भासू लागले
गंधित झाल्या हरेक वाटा
रुळावरून इंजिन घसरू लागले ...
क्षणात चुकल्या
खुपल्या वाटा
भवपाश हजारो गळू लागले ...
भेटीच्या ओढीने तुझिया
लपंडाव मी खेळू लागले ...
भावनेला कंप सुटले
विचारांना कैफ चढले
एकटी दिसता तुला मी
तुझे मनात येणे जाणे वाढले ...
मलाही कोठे कळले
गाठला कसा,कधी हा निर्णायक टप्पा
ओसंडून वाहिला हृदयाचा कप्पा
तू गोड स्वप्न की श्रावणसरी
अंतरात मोर नाचू लागले ........
अणुरेणू एवढी होऊन काया
सुखांना कवेत घेऊन उडू लागले .....
प्रेमात आकंठ बुडू लागले .......

