STORYMIRROR

Arati Patil

Romance

3  

Arati Patil

Romance

मित्र माझा पाऊस

मित्र माझा पाऊस

2 mins
159

तू होतीस

मी होतो

आणि तो आला..

मी म्हणालो..

मित्रा ... थांबव ना

अजून थोडा वेळ तिला!

त्याने बरसायला...

सुरुवात केली...

तशी माझ्या मनाची

आस पूरी झाली..

ती अजून थोडा वेळ थांबली..

आणि मी तिच्यात थांबलो..

गुंतलो... नी हरलो...

मित्रा असं काही तर कर

की ती जवळ येईल...

आमची मैत्री एक पाऊल पुढे जाईल

तू माझी आर्त हाक ऐकलीसं...

जोरदार गर्जना केलीस...

तूझ्या त्या आवाजाने..

ती घट्ट मला बिलगली...

काय सांगू मित्रा...

माझी काय दशा झाली..

ती मला बिलगली तसा..

माझ्या अंगी काटा आला.

तूझ्या त्या गार धारांत सुद्धा ..

मला घाम फुटला..

एक पाऊल पुढे म्हणता ...

तिचे असे आलिंगन ..

मला लाजवून गेले..

तिच्या मनीचे भाव खरे..

तेव्हाच मला कळले..

तिला ही कदाचित तेच हवे होते..

त्या मिठीत तिने

तिच्या प्रेमाचे सुर छेडले होते..

तिचा तो स्पर्श जणू..

भासे मला मखमली...

तिच्या चेहऱ्यावर हसू आणि

लाली होती गाली

कसे धरावे तिला...

हे प्रश्न तिनेच सोडवले.

जेव्हा प्रेमाची कबुली म्हणून

तिने मानेवर तिचे ओठ टेकवले

तिचे ते उष्ण श्वास अन् हृदयाची धडधड

माझ्या वेड्या मनाची आनंदाने पडझड...

म्हणून च की काय तू वेगळेच रूप धारण केलेस

न मागता मला प्रितीचे दान दिलेस. ..

तूझ्या त्या सरींनी आम्हाला चिंब केले...

त्या तूझ्या ओलाव्यात मी धाडस केले.

धरुनी तिचा चेहरा हाती

जेव्हा पाहिले तिच्या नेत्री

"माझी होशील का?

माझे असे प्रेम तुझ्यावरती"

असे जेव्हा म्हणालो...

तिच्या त्या डोळ्यातून

प्रेमाचे अमृत प्यालो..

माहित होते मला..

तिला ही हेच हवे होते...

पण खात्री करून

मला शिक्कमोर्तब करायचे होते..

"होय मी तुझीच आहे

तुझीच व्हायचे मला"

या शब्दाने जणू

माझा आनंद द्विगुणित केला...

त्या सुखाने मी जणू वेडा जाहलो..

तिच्या ओठांवर ओठ टेकवून

तिला जोरात बिलगलो...

तूझ्या त्या बरसणाऱ्या सरींत

आम्ही न्हाहून निघालो..

उष्ण काया दोघांची

उष्ण श्वास

आमच्या त्या प्रेमाला तुझीच होती साथ...

मित्रा

तूच असे साक्षी आमच्या प्रीतीचा

तूझ्या मुळे सुटला गुंता आमच्या प्रेमाचा...

ते क्षण अजूनही आठवतात

आम्हा दोघांना..

जेव्हा येतोस तू पुनःपुन्हा

आज ही मी तिला असेच जवळ घेतो

तूझ्या गर्जनेने आता मीच तिच्या कुशीत शिरतो

बायको माझी झाली ती

आणि मी तिचा नवरा झालो...

तुझ्याच त्या मदतीने

प्रेमाच्या गावात स्थायिक झालो...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance