STORYMIRROR

सुरेश सोनवणे (प्रतिभाग्रज)

Romance

3  

सुरेश सोनवणे (प्रतिभाग्रज)

Romance

तो तू पाऊस!

तो तू पाऊस!

2 mins
298

आषाढाच्या पहिल्या दिनी,

काळ्या काळ्या मेघांतूनी,

ओढ लावतो प्रेमाची!

कालिदासाच्या त्या,

मेघदूता मध्ये,

प्रेमवर्षाव

करणारा,

पाऊस

तूच

रे!


खळखळणार्या झर्यास!

खडकातील वाहत्या,

खळाळत्या नदीस!

खोल पडत्या

धबधब्यांस!

कारण तू

पाऊस

तूच

रे!


सदैव व्यग्र माऊलीस!

संसारचक्रातील त्या

सासुरवाशीणीस!

सय माहेरची,

सदा देतोस,

सवंगडी,

पाऊस

तूच

रे!


सत्तावीस त्या नक्षत्रांस,

सार्थकी तो लावतोस!

सजीवांस पोसतोस!

सर्वत्र बरसतोस!

सदा करतोस,

सगळ्यांचे

संगोपन!

पावसा

तूच

रे!


मोहरलेला तू पाऊस!

मायमाऊली मातीत,

मिसळून जातोस!

मृदा गंधातील,

मंद सुवासे

मोहवतो

पाऊस!

तूच

रे!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance