STORYMIRROR

Vrushali Date

Romance Inspirational

3  

Vrushali Date

Romance Inspirational

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे काय असतं? तुमचं आमचे सेम नसतं

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे काय असतं? तुमचं आमचे सेम नसतं

2 mins
315

कुणी झाडा फुलांवर प्रेम करतं

कुणी मुक प्राण्यांवर

कुणी किटक पक्ष्यांवर

तर कुणी निर्जीव वस्तूंवर करतं

…

कुणी समुद्र लाटांवर प्रेम करतं

कुणी गिरी शिखरांवर

कुणी दाट जंगलांवर

तर कुणी आकाश नक्षत्रांवर करतं

…

कुणी मदत घेण्यास प्रेम करतं

कुणी मदत देण्यास करतं

कुणी अश्रू पुसण्यास करतं

तर कुणी शिकवण्यास करतं

…

कुणी निव्वळ टाईमपास म्हणून करतं

कुणी तुलाच सगळा टाईम गं म्हणून करतं

कुणी वेळ जाईंना म्हणून करतं

तर कुणी वेळे चे भान नसल्या गत करतं

…

कुणी आई ची माया म्हणून करतं

कुणी बाबांची सेवा म्हणून करतं

कुणी बहिणीची ची खोडी म्हणून करतं

तर कुणी भावाचा चा दरारा म्हणून करतं

…

कुणी unconditional करतं

कुणी with terms and conditions करतं

कुणी legally करतं

तर कुणी चोरून करतं

…

कुणी कुणावर ही करावं

कुणी कितीही करावं

पण कुणा ठाऊक नसतं

दुस-यां पेक्षा प्रेम स्वःतावर जरा जास्तचं असतं

…

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे काय असतं?

तुमचं आमचे सेम नसतं


#lovelanguage


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance