STORYMIRROR

Vrushali Date

Romance

3  

Vrushali Date

Romance

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे काय असतं? तुमचं आमचे सेम नसतं

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे काय असतं? तुमचं आमचे सेम नसतं

1 min
736

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे काय असतं?

तुमचं आमचे सेम नसतं


कुणी झाडा फुलांवर प्रेम करतं

कुणी मुक प्रणयांवर

कुणी कीटक पक्ष्यांवर

तर कुणी निर्जीव वस्तूंवर करतं


प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे काय असतं?

तुमचं आमचे सेम नसतं


कुणी समुद्र लाटांवर प्रेम करतं

कुणी गिरी शिखरांवर

कुणी दाट जंगलांवर

तर कुणी आकाश नक्षत्रांयर प्रेम करतं


प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे काय असतं?

तुमचं आमचे सेम नसतं


कुणी मदत घेण्यास प्रेम करतं

कुणी मदत देण्यास करतं

कुणी अश्रू पुसण्यास करतं

तर कुणी शिकवण्यास करतं


प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे काय असतं?

तुमचं आमचे सेम नसतं


कुणी निव्वळ टाईमपास म्हणून करतं

कुणी तुलाच सगळा टाईम गं म्हणून करतं

कुणी वेळ जाईंना म्हणून करतं

तर कुणी वेळे चे भान नसल्या गत करतं


प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे काय असतं?

तुमचं आमचे सेम नसतं


कुणी आई ची माया म्हणून करतं

कुणी बाबांची सेवा म्हणून करतं

कुणी बहीणीची ची खोडी म्हणून करतं

तर कुणी भावाचा चा दरारा म्हणून करतं


प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे काय असतं?

तुमचं आमचे सेम नसतं


कुणी unconditional करतं

कुणी with terms and conditions करतं

कुणी legally करतं

तर कुणी चोरून करतं


प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे काय असतं?

तुमचं आमचे सेम नसतं


कुणी कुणावर ही करावं

कुणी न ही करावं

कुणी कितीही करावं

पण कुणा ठाऊक नसतं

दुसर्या पेक्षा प्रेम स्वःतावर जरा जास्तचं असतं


प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे काय असतं?

तुमचं आमचे सेम नसतं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance