STORYMIRROR

Deepak Ahire

Classics Inspirational

3  

Deepak Ahire

Classics Inspirational

ध्येय...

ध्येय...

1 min
213

ध्येय ठरवलं की, जीवनप्रवासाला मिळते दिशा,

क्षमताबळ विकसित होते,पल्लवित होतात आशा

ध्येय हेच एकमेव लक्ष्य,सर्व ऊर्जा केंद्रित त्या दिशेने,

जगण्याला रोखठोक स्पष्टता,पाऊले टाकावी आत्मविश्वासाने

एका ध्येयातून नव नवी, ध्येय होतात प्रकट,

एका ध्येयप्राप्तीने, नवीन ध्येयाचा नसतो शेवट

ध्येय जितकं मोठं असेल, यशप्राप्तीही तितकीच मोठी,

प्रबळ ध्येयनिष्ठा नेते ध्येयापर्यंत, उद्दीष्टय गाठावी छोटी छोटी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics