ध्यानी मनी नसताही
ध्यानी मनी नसताही
ध्यानी मनी काहीच नसताही
तू परवा माझ्या स्वप्नी आलात ....
जागल्या जगासारखाच
स्वप्नाही अबोल .....!फक्त माझ्यापुरता ,
एरवी तू केवढा तरी बोलघेवडा !
तुला मी विसरले ?
तुझी आठवण तरी नक्कीच नाही काढलेली
गेल्या कित्येक दिवसात !
तुझं नावच नको म्हणण्याइतकं
वाईट काहीच घडलेलं नाही आपल्यात
पण आपण एकत्र येऊ नये
याहून काय वाईट म्हणा नियतीच्या मनात?
तुझा सुखी संसार
माझाही छान परिवार
वाटतं, कशाला गुंतत राहायचं
पुन्हा जुन्याच धग्यांत ?
म्हणून नाव नाही काढत मी तुझं
पण तरीही मधूनच स्वप्नात का बर येन ?
इतक्यात वर्षात जे सांगितलं नाही
ते बहुदा तुला आता सांगायचंय
असे डोळ्यात भाव ,
किमान मला तरी तसेच भास
पण तू काही बोलत नाहीस
अधुऱ्या कहाणीसारखं
स्वप्नाही अधुरचं राहतं
ठाऊक असलेलेच शब्द
तुझ्या तोडून ऐकण्यासाठी
किती आसुसलेलं असतं
स्वप्नातही तो योगा
हेच पुनःपुन्हा सांगत, नाही
निवळलेल्या पाण्यावर पुन्हा तंरग उठवून जात तुझं स्वप्न!!!!!!!!

