धुंद क्षण
धुंद क्षण
गुंफले तुला हाताच्या हाराने
तू ही स्विकारले मज स्मित हास्याने
लडिवाळ खेळ न्यारा खेळतांना
धुंद होऊ चल प्रितवा-याने...//१//
सखे, तुझ्या अलवार स्पर्शाने
किती आनंदीत आज मी झालो
प्रीत भावना उफाळून आल्या
बरसत्या सरीत चिंब न्हालो....//२//
मोकळ्या काळ्या केशात तू गं
नाजूक कलिकेचा ताज घातला
मोहक सुकोमल रूपाला पाहून
तुझा मला अजूनच नाद लागला.....//३//
एकांत प्रितीच्या गोड क्षणी
माझ्या सखीला घेतले पाठीवर
गोड गाली कळी खुलवत ती ही
झाली स्वार हसत भराभर.....//४/

