धरणी
धरणी
सौंदर्यवतीच्या सौंदर्याप्रमाणं
सौंदर्यात नहाली ती धरणी।
गगनाच्या त्या आलिंगनानं
फुलून गेली ती धरणी।
नानाविध ते अलंकार लेवून
झाली आकाशा सामोरी
प्रेमळ त्याच्या मद्य कटाक्षानं
मोहरून गेली ती धरणी।
नभाच्या मोहक चूंबनानं
गर्भवतीसम टवटवीत
झाली ती धरणी