STORYMIRROR

Vishal Doke

Drama

1.4  

Vishal Doke

Drama

धन्यवाद

धन्यवाद

1 min
15.5K


अपार कष्ट सोसले माझ्यासाठी,

अनेक धन्यवाद तुझे त्यासाठी,

तुझ्या कष्टाची सुरुवात झाली तेव्हा,

जेव्हा मी होतो तुझ्या पोटी.


फुलाच्या पाकळी वाणी सांभाळीले मले,

पोटात घेऊन चालली नऊ महिने,

कुठेही ठेच येऊ दिली नाही मला,

कधीही फेडू शकणार नाही हे उपकार मी तुझे.


गर्भाचा बाहेर आलो मी,

पहिले अन् तू पाजिले,

आठवतो तो एकच दिवस मले,

जेव्हा मी रडलो आणि तू हसली होती.


सोसोनी कष्ट एवढे,

नाव लाविले वडिलांचे,

भरुनी प्रेम आणि त्याग हे गुण,

'आई' ही मूर्ती बनवली देवाने.


झाली सुरुवात आयुष्याची तुझ्यामुळे,

एवढे सुंदर जग तू दाखविले,

या सगळ्यासाठी नाही आहे माझ्याकडे असे काही,

ज्याने करू शकू माउली, धन्यवाद तुझे.


Rate this content
Log in

More marathi poem from Vishal Doke

Similar marathi poem from Drama