STORYMIRROR

sant chokhamela

Classics

2  

sant chokhamela

Classics

धांव घाली विठू आता

धांव घाली विठू आता

1 min
15.2K


धांव घाली विठू आता चालू नको मंद।

बडवे मज मारिति ऐसा काही तरि अपराध ॥१॥


विठोबाचा हार तुझे कंठीं कैसा आला।

शिव्या देती म्हणती महारा देव बाटविला ॥२॥


अहोजी महाराज तुमचे द्वारींचा कुतरा।

नकाजी मोकलू चक्रपाणि जिमेदारा ॥३॥


जोडुनिया कर चोखा विनवितो देवा।

बोलिला उतरी परि राग नसावा ॥४॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics