STORYMIRROR

sant chokhamela

Classics

2  

sant chokhamela

Classics

आम्हां नकळे ज्ञान न कळे पुराण

आम्हां नकळे ज्ञान न कळे पुराण

1 min
15.3K


आम्हां न कळे ज्ञान न कळे पुराण।

वेदांचे वचन नकळे आम्हां ॥१॥


आगमाची आढी निगमाचा भेद।

शास्‍त्रांचा संवाद न कळे आम्हां ॥२॥


योग याग तप अष्टांग साधन।

नकळेची दान व्रत तप ॥३॥


चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा।

गाईन केशवा नाम तुझें ॥४॥


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics