STORYMIRROR

Amol Shinde

Tragedy

4  

Amol Shinde

Tragedy

डोळे झाकून हसलेलं पुस्तक

डोळे झाकून हसलेलं पुस्तक

1 min
266

बघ ना कसा पाऊस बरसतोय

अगणित स्पंदनासाठी तरसतोय

तुझ्या मिठीचा अन् माझ्या मिठीचा 

एक एक भाग आज गरजतोय


तू येशील सगळं काही ठीक होईल 

का कोणास ठाऊक तुझं नसलेलं प्रेम

अन् माझं डोळे झाकून हसलेलं पुस्तक

काळजाच्या कप्प्यात होणारी दस्तक


श्वासापासून ओठापर्यंत

अडकलेले शब्द 

झाले होते स्तब्ध

काळजाचा आकांडतांडव

तू नसतांनाही सजलेला मांडव

गप्प झाला नाव माझे खोडल्यापासून


सुगंध होऊन येणारा मी कधी

ओळखलं नाही तू या आधी

वात विझून गेली तिरस्कार पाहून

कळलं तेव्हाच सारं काही

उपयोग होणार नाही जवळ राहून


भ्रमराचे उड्डाण मकरंद

टिपण्यासाठी थांबले

त्याचेच आवडते फुल

आज तू इथे टांगले

गुदमरून जीव गेला आहे त्याचा

तुझ्या स्पर्शाचा काही एक सबंध नसताना

कारण त्याला हवी होती मोकळीक

कधी हवीहवीशी वाटणारी जवळीक


हं... आता कुठं ते मिळणार आहे

गप्प बसून सारं मी गिळणार आहे

तुझा तिरस्कार, तुझा अहंकार बस्स...

मरणाने फक्त आता दस्तक द्यावी

खोटी प्रीत नतमस्तक व्हावी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy