STORYMIRROR

vaishali vartak

Romance

3  

vaishali vartak

Romance

डोळे हे जुलमी गडे

डोळे हे जुलमी गडे

1 min
214

लाडिक बट सावरण्याचा

चालविला तू उगा बहाणा

तिरप्या नजरेने तू पाही

समजण्या मी होतो शहाणा


सहजतेने पहाता तुजला

सवय ही जडली मनाला

कितीदा नव्याने समजाविले

 काही केल्या रुचेना जीवाला


डोळे हे जुलमी गडे

ठसले मम चित्तात

तिरपा कटाक्ष तुझा

घुसला थेट काळजात


 पूरे ना खेळ कटाक्षांचा

भुरळ माझ्या मनाला पडे

किती समजावू तुजला

डोळे हे तव जुलमी गडे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance