STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Romance Fantasy Inspirational

4  

Neha Ranalkar(Nawate)

Romance Fantasy Inspirational

चंद्र नको मज सूर्य हवा

चंद्र नको मज सूर्य हवा

1 min
882

सूर्य माझा आहे प्रियकर 

चंद्राहून नसे का ना शीतल

मी त्याची प्रियतमा पृथ्वी

प्रेम आमचे अगदी विमल


त्याचा दाह साहवेना जरी

बाष्पीभवन करत जाई

पावसाच्या ढगांना तोच

बरसण्याची करीतसे घाई


कुसुमाग्रजांना ही श्रेष्ठ अजरामर

"पृथ्वीचे प्रेमगीत"काविता स्फुरली

त्यांच्या मिलनापेक्षा ही विरहाची

कल्पनाच खरेतर सर्वोत्तम ठरली


मला ही दिनकरराव आवडतात 

नावाने प्रसिद्ध खूप जरी असले

भास्कर , दिवाकर,आदित्य,सूर्य

तरी रवी ह्याच नावात मी फसले


युगानुयुगे आस एकमेकांना असे

न ये ती दोघांच्या मिलनाची रात्र

मनापासुन असता प्रेम खरे जर

आत्माच अमर विनाशी ती गात्रं


शशिकांत च्या हजारो चंद्रिका

मी मात्र एकमेव रविची धरा

नशिबाने मिळाला आहे मज

सर्वात तेजस्वी हिरा तो खरा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance