Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

swati Balurkar " sakhi "

Romance Fantasy

2  

swati Balurkar " sakhi "

Romance Fantasy

चंद्र आणि तू!

चंद्र आणि तू!

1 min
55


कितीतरी शाब्दिक रात्री

रंगल्या कल्पनेच्या कागदावर,

तुलना तुझी अन् पौर्णिमेच्या चंद्राची!

किती आस होती पाहण्याची

पौर्णिमेच्या चंद्राला

तू आयुष्यात येण्यापूर्वी!

तुला कधी चंद्र दिसला का रे

माझ्या चेहर्‍यांत , डोळ्यांत?

पण माझ्यासाठी तूच चंद्र होतास!

तू गेलास अन् जाताना नेलास

तो चंद्र अन् मंद पौर्णिमेच्या रात्री,

तुझी आस नाही, चंद्राची ओढही नाही आता!

आता माझ्यासाठी चंद्राचं अस्तित्व

नाही एका उपग्रहापेक्षा जास्त ,

तो माझा भाऊही नाही आता!


Rate this content
Log in