STORYMIRROR

vaishali vartak

Fantasy Others Children

2  

vaishali vartak

Fantasy Others Children

चला पावसात भिजू

चला पावसात भिजू

1 min
61

चला पावसात भिजू

झेलू पावसाचे पाणी

भिजण्याची मजा न्यारी

खेळू नाचू गाऊ गाणी


पावसात भिजण्याची

 पूरी करु आज हौस

सरीवर सरी येती

आला रे मोठा पाऊस


नभी गडगडे ढग

मधे वीज चमकते

नका घाबरु वीजेला

बघ म्हातारी दळते


फाडा वहीची ती पाने

करु कागदाच्या होड्या

सोडू पाण्यात तयांना

मस्ती करु, थोड्या खोड्या


पहा पागोळ्या पडती

भरु  थेंब ओंजळीत 

फेकू अंगावर पाणी

मजा येते ओसरीत


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy