STORYMIRROR

SHASHIKANT SHANDILE

Tragedy Others

3  

SHASHIKANT SHANDILE

Tragedy Others

चिंतन .........

चिंतन .........

1 min
277

केविलवाणे रूप घेऊनि

फिरत राहिला अनवाणी

असे सोसले घाव ऋतूंचे

छडत राहिला क्षणोक्षणी


थंड शहारा विना कापडी

झुंज कंटकी वाटेशी

रक्तरंजित अंगण सारा

उमेद नव्याने पाठीशी


नवे प्रयत्न नवीच आशा

आशेवरची नवीच प्रीती

अश्रूंनी भिजलेले डोळे

दरवेळी का नवीच नीती


अर्ध्यावरती झुंज सोडूनि

हार मानली बेचाऱ्याने

चूक आपली कुठे जाहली

विचार करावे का त्याने


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy