STORYMIRROR

Aarya S

Comedy Fantasy Children

3  

Aarya S

Comedy Fantasy Children

चिमण्या बाळाच घर

चिमण्या बाळाच घर

1 min
236

छोटस घर बांधून पाहू,

बाळासोबत सुखात राहू


ठरवलं चिमणीच्या छोटया जोडीने,

बाळाला ठेवायचं आनंदी गोडीने


बाळाचे करायचे खूपच लाड,

शोधू लागले छानसे झाड


मिळाली जागा सुंदर झाडी,

जमवू लागले काडी काडी


केले कष्ट बांधलं घर,

आता राहीलं फर्निचर


तीनच खुर्च्या होतील बास,

टेबलावर पुस्तकं ठेऊ खास


एका बाजूला मोबाईल राहील,

त्याच्यावर बाळ कार्टून पाहिल


बेडरूम मध्ये ए सी लागेल,

तरच बाळ शांत झोपेल


बाळासाठी घेऊन पाळणा,

त्याच्यावर बांधू गोलगोल खेळणा


घरामध्ये लावली लिफ्ट,

चिमणा चिमणी झाले शिफ्ट


पाहुनी ते घराचं रूप,

बाळ झालं खुश खूप


बाळाच्या गाली हसू फुलले,

चिमणा चिमणीचे डोळे भरले


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Comedy