STORYMIRROR

kaviraj amol mandhare

Inspirational

3  

kaviraj amol mandhare

Inspirational

छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र

छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र

1 min
273

कल्पना आली एकदा मनात

छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र

अभिमान वाटे सर्वांना, पाहून आदर्श स्वराज्य

एक युग होते एक युग होते

जेव्हा शिवरायांचा जय जय कार होता

तलवार त्यांच्या पराक्रमाची धार होती

मनात आदर्श स्वराज्याची संकल्पना.

तेव्हाचा बळीराजा सुख समृद्ध होता

दुष्काळात तो मायेच्या सावलीत होता

माता भगिनी निर्भीडपणे जगत होत्या

तेव्हा आठवा, आजचा फरक

युवकांनो तुम्हीच घ्या हातात

स्वराज्याची ज्वलंत मशाल

दाखवा जगाला सर्वांना

आपल्या राजाचा आदर्श इतिहास

दुष्काळाची, दहशतवादाची काय बिशाद उभे ठाकण्याची

घ्या जबाबदारी युवकांनो

तुम्ही आपल्या थोर माऊलीची

संस्कार करणाऱ्या बापाच्या कष्टाच्या मोलाची,

मनगटावर राखी बांधणार्‍या भगीनीच्या रक्षणाची

शिवरायांचा तो युवक, झटत होता

माऊली संतांची शिकवण देत होती

बाप राष्ट्रहिताचे धडे देत होता

एक कवी म्हणून आली माझ्यावर जबाबदारी.

सांगीन मी काव्यातून, सर्व जगाला

छत्रपती शिवरायांचे चरित्र

जे जगाला सांगत आहे

कसे असावे आदर्श स्वराज्य

सांगेन मी युवकांना त्यांचे कर्तव्य

शेकडो काव्यातून सांगीन मी

प्रबोधनाचे शिवरायांचे धडे

व्यसनमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त नवी पिढी, जी असेल उद्याच्या भविष्याची पायाभरणी

घेतली आहे आम्ही उत्तुंग झेप

पण आजही संस्कृतीचा आमच्या आदर.

समाजकार्याची प्रतिमा जागवून

सांगितले शिवरायांनी आम्हाला

कसे जगावे, कसे मरावे

आणि कसे रमावे लोक सेवेत


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational