STORYMIRROR

kaviraj amol mandhare

Inspirational

4  

kaviraj amol mandhare

Inspirational

आई थोर तुझे उपकार

आई थोर तुझे उपकार

1 min
304

आई थोर तुझे उपकार 

या कलियुगात जगात आपल्या

मी आईच्या कुशीत झालो मोठा

लोभ नाही स्वार्थ नाही

तर फक्त मायेने हात माझ्यावर फिरवला

शाळेत जायच्या आधी बोटाला धरून शिकवले

कित्येक दिवस रात्र जागून मला शांत झोपले

दोघा भावंडांना समान वागणूक दिली

प्रेमाबरोबर रक्तात शिस्तही घडवली

अभ्यासाबरोबर संतांची शिकवणूक ही दिली

स्वतःबरोबर परमार्थाची महतीही पटवली

जगात सर्वजण स्वार्थासाठी जगतात

पण फक्त कुटुंबाची काळजी घेते माझी माऊली

जशी दिली शिवरायांना शिकवणूक आदर्श स्वराज्याची

तशीच दिली मला ही ओळख परोपकाराची

तेव्हा घ्या जबाबदारी युवकांनो तुम्ही आपल्या थोर माऊलीच्या सेवेची

कणभर का होईना पण करा 

परतफेड उपकाराची

आई तुझी अशीच कृपा राहू दे माझ्यावरी

झालो असे मी आज मोठा पण नाही विसरून चालणार तुझीच माया

झालो मी कवी तुझ्याच मायने आज वर्तमानात

पण अजून घडती आशीर्वादाने तुझ्या

एक नाहीतर लक्ष लक्ष काव्य घडतील माझ्या हातूनी.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational