STORYMIRROR

Govardhan Bisen 'Gokul'

Romance Fantasy Others

3  

Govardhan Bisen 'Gokul'

Romance Fantasy Others

छेडू नको साजणा

छेडू नको साजणा

1 min
209

हात जोड़ते राधा, गवळण लाजरी |

छेडू नको साजणा, वाजवून बासरी ||धृ||


दही दुधाकरिता, मटकी फोडतोस |

आंघोळ करतांना, कपड़े चोरतोस ||

नजर नको टाकू, अशी आमचेवरी |

छेडू नको साजणा, वाजवून बासरी ||१||


अडवू नको कान्हा, या  नंदनवनात |

भिती वाटते तुझी, या पामर मनात ||

वाट सोड तू माझी, जाऊदे मज घरी |

छेडू नको साजणा, वाजवून  बासरी ||२||


रंग-पंचमी दिनी, तू उधळतोस रंग |

भिजुनी गवळणी, सर्व होतात दंग ||

नको देऊ त्रास तू, मानतो तुला हरी |

छेडू नको साजणा, वाजवून बासरी ||३||


पाहून गवळणी,  तू करतोस चाळे |

रंग तुझारे काळा, अन् मनही काळे ||

सोड नाद अमुचा, सांगे राधा बावरी |

छेडू नको साजणा, वाजवून बासरी ||४||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance