STORYMIRROR

Mangesh Medhi

Inspirational

3  

Mangesh Medhi

Inspirational

चेकमेट

चेकमेट

1 min
696


सहजची सुरु केला खेळ म्हणूनी

का ओढला गेलो रीत म्हणूनी

मग डावास प्रतिडाव माझाही

शह काटशह झिंग नुसती

कळलेच नाही कधी कसे

जीवनची सारीपाट होऊन गेले

जाता येता नडतात उंट,घोडे प्यादी

पदोपदी बदलतात इथे चाली

जो तो फसवी ज्याला त्याला

हर एक म्हणे मीच शह दिला

कुणा वाटे चाल माझी एटीची

उधळत जाइ त्यास वाट जो आडवी

तर काही तोर्‍यात तिरके भिडती

मस्तवाल तो चिरडत हिंडती

तर कोणी सदैव घुसतो स्वैर

फिरावे वाटेल तसे वाटेल तिकडे

खरे तर कोणाच्या हातात काहीच नसते

कारण आपण सारेच आहोत प्यादे

नाचवी तो सुत्रधार पडद्याआड खरा

बसला आहे मांडून पट दुनियेचा

खेळवून गुंगवून करीसी चेकमेट, करीसी चेकमेट

उमगले मग व्यर्थ हे लढणे

घडत होते आजवर ते भ्रम नुसते

जिच्या करिता म्हणूनी लावीला दाव

पोरका टाकून उठली मला माझा डाव

उधळला मग मी अधुरा तो डाव

हिरव्या पायघडीवरी चौखुर धाव

चौकट ना उरली ना नियम राहीले

खेळ खेळातच गुंढाळीला

जीवनी मुक्त श्र्वास मी भरिला

बुद्धीबळ असावे कोडे उकलाया

ना की कोड्यातूनी कोडे विणाया

प्यादे प्यादे साधेल बुद्धी भेद

सुत्रधार ही होइल चेकमेट, होइल चेकमेट



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational