बरसू दे प्रेम आता
बरसू दे प्रेम आता
बरसू दे प्रेम आता
नको मनी राग द्वेेेष
चार दिवसाची जिंदगी
कर्म चांगले राहील शेष...!!
उसवल्या नात्याला
विण प्रेमाची गुंफू या
एकमेकांचा आधार
खंबीरपणे होऊ या....!!
नाही काही नेणार
जाताना देवाघरी
माणसाची माणुसकी
बरसो प्रेमाच्या सरी...!!
नको दुःख चिंता उरी
राहू प्रेमाने चांगले
एकमेका साहाय्य
करणारे माणसे भले....!!
सुखदुःखाच्या वाटा
शोधू सुखाचा मार्ग
माणसाचे भलं कर
मिळेल धरेवर स्वर्ग....!!