STORYMIRROR

अरविंद कुलकर्णी

Inspirational

3  

अरविंद कुलकर्णी

Inspirational

बरसात होऊ दे रे

बरसात होऊ दे रे

1 min
307

मेघ पावसाळी आले

भोवताली अंधारले

लखलखाट विजांचा

बरसात होऊ दे रे ||१||


तप्त जाहली ही धरा

मनावरती घे जरा

शांतवाया रे तीला

बरसात होऊ दे रे. ||२||


भरभरून तू देता

अंकूरेल पृथ्वी माता

भेगाळल्या मातीवर

बरसात होऊ दे रे ||३||


करील धरा शृंगार

होईल हिरवीगार

धीर आता धरवेना

बरसात होऊ दे रे ||४||



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational