STORYMIRROR

Payal Bhusate

Abstract Inspirational

4  

Payal Bhusate

Abstract Inspirational

बलात्कारी राख आहे

बलात्कारी राख आहे

1 min
894

पाहिले मी त्या बापाचे डोळे 

एक एक थेंब रक्ताचं डोळ्यात जिरवत होता 

लेकीची, राख होतांना एकटक तो पहात होता 


पोटचा गोळा त्यांचा किंचाळत होता 

मन मारलेल्या त्या बापाची व्यथा

तो नराधम दुरून मजा पाहत होता


जळत होती ती लेक

त्या बापाचं काळीजही फाटतं होतं 

जळत्या लेकीच्या आत्मशांतीसाठी

न्यायाचं भिक मागत होतं


जळून राख तिची होते

कोणाची कोणी नाही हो 

त्या माय बापाची लेक जाते 

त्या माय बापाची लेक जाते


शिक्षा भोगतो तो बाप आहे

अन तो बलात्कारी मोकाट

दुसऱ्या बापाची लेक शोधतो आहे


वेदना त्या बापाच्या समजणारा कोण आहे

इथं न्याय मागायला फिरतो तो बापं

बलात्कारी तर आझाद आहे


म्हणून म्हणते आई बहिण ताई

तुझ संरक्षण तुझ्या हाती आहे 

एकही नराधम टिकणार नाही इथं

दुर्गा अण काली तुझं रूप आहे 


तुझ्या नारीशक्तीचा नाही कुणाला ठाव आहे

दाखवून दे माऊली तुझ रूपं

तो बलात्कारी राख आहे

तो बलात्कारी राख आहे



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract