बाबा
बाबा
स्वप्न माझे अनोखे
त्यात बाबा तू मला दिसतो
बाहुलीला माझ्या तू चांदण्यांने सजवतो!
सुख दु:खाच्या रानात
तू स्वतः मिरवून येतो
मखमली गादीवर, मात्र
मला निवांत झोपू देतो!
तुझ्या मायेचा पाझरं बाबा
फ़क्त माझ्या स्वप्नात फुटतो
डोळे उघडतास बाबा,
तू लपून का रे बसतो?
अनोळखी जगात या
हरवली मी बाबा
अधार नाही कुणाचा इथं
एकटी पडली मी या वनात!
वाटते मज आता,
तुलाचं बघावं स्वप्नात
मिटून डोळे एकदाचे
निवांत निजाव आता
निवांत निजाव आता!!

