मायबापाची पुण्याई
मायबापाची पुण्याई
1 min
282
आई बापाची पुण्याई
त्यास दिसती विट्ठल रखुमाई
गाठ आहे लेकरांची
साथ आहे जन्माची
काळजावाणी वाढवलं आम्हास
फ़ेडावे कसे उपकार कळतंच नाही
मारली स्वतःची दु:ख
दिले आम्हास सुख
विचार न करता स्वतःचा
केला विचार आमचा
तळहाताच्या फ़ोडावाणी
वाढवलं आम्हास सुखात
आईची माया बापाची छाया
उजळून नेते आयुष्याचा दिवा
ईश्वर चरनि एकच प्रार्थना
अमर राहूदे त्यासनी देवा
अमर राहूदे त्यासनी देवा
