STORYMIRROR

Jyoti gosavi

Romance

3  

Jyoti gosavi

Romance

बिजली ताईची मदत

बिजली ताईची मदत

1 min
42

एकदा काय झाले

 आभाळ आले झाकोळून

 नेहमीप्रमाणे ती छत्री

 आली होती विसरून

 टपोरे थेंब गालावरून

 झरझर आले ओघळून

 अशाच एका झाडाखाली

 ती थोडीशी अवघडून

 ओलीचिंब तिची तनु

 केसांमध्ये मोती माळून

 पाहुनी ते रुपडे तिचे

मेघ आला दरवळून

  सावरीत ओले कपडे

 किंचीत थरथर अंगाला

 धांदल तिची बघताना

 वाराही आला रंगाला

 पाहताना ती जलपरी

 मी ही झालो धुंद

 झाकोळल्या जरी दिशा

 मनातला ओला गंध

पापणी देखील न हलवता

 तिला बघण्याचा जडला छंद 

छत्री धरता दोघां वरी

 अत्तराचा सुवास मंद

 निशब्द उभे आम्ही दोघे

 रुतली नजरेत नजर

 मदतीला आली बिजली ताई 

 केला मोठा गजर

 ठरलो त्याक्षणी भाग्यवान मी

 शोध माझा संपला

घट्ट पडली गळा मिठी

 अर्थ आला जीवनाला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance