भेटतील का
भेटतील का
येथे हाताला हात देणारे भेटतील का?
जमिनीवर ते चंद्र-तारे, भेटतील का?
मनाच्या मातीवर फुलवाया नंदनवन,
नांगरणीला ती अवजारे,भेटतील का?
रखरखत्या उन्हात असे झाड तोडता,
सावली आणि गार वारे, भेटतील का?
दुःखाला जो घाबरतो जीवनी त्याच्या,
अहो रोज रोज सुखे सारी भेटतील का?
