शाळा एकटी पडली
शाळा एकटी पडली
आज का कोणास ठाऊक
शाळेची आठवण आली..
त्या निःस्वार्थ मैत्रीची आठवण
डोळ्या समोरून तरळून गेली..
ते दप्तर तो गणवेश त्या वह्या पुस्तके
आठवून डोळ्यात पाण्याची धार आली..
एप्रिल मे महिना सुट्टी असायची
ती मज्जा मस्ती एकदम आठवली..
आता तर सगळं बंध आहे हेच आठवण
मन सुद्धा अचानक कासावीस झाली..
असं त्या वेळी काहीच घडलं नाही पण
ह्यामुळे माझी शाळा मात्र एकटी पडली..
बिचारे शिक्षक शाळेतले मामा आणि मावशी
ह्यांची शाळेविना परिस्थिती आठवली..
खेळायचा परिसर बाकडे प्रथनेची जागा
ह्या वर धूळ मात्र साठत राहिली..
परत शाळेत जाता येत नाही
याची कुणास ठाऊक खंत वाटली..
सगळं पहिल्या सारखं होऊ दे
माझी शाळा हसत राहू दे अशी प्रार्थना केली..
