STORYMIRROR

Sanket Potphode

Romance

4.7  

Sanket Potphode

Romance

भेट

भेट

1 min
13.5K


तो होता दिवस पावसाळी

सुर्य नव्हता आभाळी

पाहता तुझ्या गाली खळी

खुलली माझी कळी


घेतला तुझा हात माझ्या हातात

आणि सुरू झाली पावसाची बरसात

सुगंध मातीचा दरवळला मनात

आणि समुद्राच्या लाटा गुंजल्या कानात


या पावसात धुंद भिजताना

पाहिले मी तुला मुक्त हसताना

तु माझ्याशी बोलत असताना

पाहिले मी तुला हलकेच लाजताना


तुझे हे बोलणे

एकटक माझ्याकडे पाहणे

हळुवार हसणे

आणि मधुनच लाजणे


हे काय आहे कोणालाच कळले नाही

आपल्या दोघांतले नाते कोणालाच समजले नाही

भेटून तुला उमगले मला सारे काही

आहे हे वेगळे का नेहमीचेच काही?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance