STORYMIRROR

Kshitija Pimpale

Romance

3  

Kshitija Pimpale

Romance

भेट

भेट

1 min
14.6K


भेट तुझी माझी

स्वप्नात होती झाली

मंद होता वारा

धुंद फूलवेली... !!१!!


सारे कसे होते

नीरव अन् शांत

पाशात परस्परांच्या

दोघे होतो निवांत... !!२!!


नव्हते कसलेच बंधन

ना धाक ना दरारा

स्पर्शुनी जाई वारा

अंगावरी शहारा ... !!३!!


हृदयाचे बंध जुळले

प्रीती फळास आली

मोहरून गेली काया

लाज गाली आली... !!४!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance