STORYMIRROR

Prachi Raje

Inspirational

3  

Prachi Raje

Inspirational

भारत भाग्य विधाता

भारत भाग्य विधाता

1 min
465


देश प्रगती करतो आहे।

होय, माझा देश आता प्रगती करतो आहे!


असो क्रीडा वा कला क्षेत्र ते,

अथवा असू दे अन्य कोणते;

माझ भारत आता अव्वल ठरत आहे।

जगाच्या प्रत्येक क्षेत्रात आपले अस्तित्व सिद्ध करत आहे।

होय, माझा देश आता प्रगती करतो आहे!


फुटबॉलचा असो खेळ की,

क्रिकेटच्या विकेट्सचा बसू दे मेळ।

नेमबाजीच्या स्पर्धांमध्ये सुवर्णपदकांची रेलचेल।

उंचावतोय आत्मविश्वास देशाचा,

आमची कामगिरी नेत्रदीपक आहे।

जगाचे लक्ष वेधून घेत, भारताची शान वाढते आहे।

होय, माझा देश आता प्रगती करतो आहे!


जगात वाढू दे नावलौकिक।

सारे विश्व करू दे कौतुक।

ऑलिंपिक आणि वर्ल्डकप स्पर्धांमध्ये ,

भारतीय चमूचा विजय निश्चित आहे।

होय, माझा देश आता प्रगती करतो आहे!


अभिमान आहे मला माझ्या देशाचा।

मीच सुबुद्ध नागरीक भारताचा।

माझ्या देशाच्या प्रगतीमध्ये माझा पाठिंबा खास आहे।

लहरेल झेंडा भारताचा हा माझा विश्वास आहे।

विश्वाच्या नकाशामध्ये भारताचे अढळ स्थान आहे।

होय, माझा देश आता खरोखरच प्रगती करतो आहे !!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational