STORYMIRROR

Prachi Raje

Inspirational

4  

Prachi Raje

Inspirational

भाग्य विधाता

भाग्य विधाता

1 min
554

भाग्य विधाता मतदाता, तूच असशी भारताचा भाग्य विधाता।

तूच घडविशी विधान आणिक तुझिया हाती सत्ता॥


तूच ठरविशी कोणी चढावे सर्वोच्च पदावर।

तूच खेचशी खाली कोणा, आणशी भूमीवर॥


तुझ्याच बोटामध्ये राहे सार्वभौम सत्ता।

मतदाता, तूच असशी भारताचा भाग्य विधाता॥


जो कष्टाने सृष्टी उभारी , तोच असे प्रिय तुला।

लुबाडतो जो गरीब जनांला, तुझ्यापुढे हारला॥


तूच चढविशी, तूच घडविशी, करिशी बळकट देशाला।

मतात तुझिया ताकद आहे, मान पवित्र त्याला॥


ह्या देशाचे भविष्य उज्वल, तूच माय, तू पिता।

मतदाता, तूच असशी भारताचा भाग्य विधाता॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational