बहाणे तुझे ते कळलेचं नाही
बहाणे तुझे ते कळलेचं नाही
बहाणे तुझे ते कळलेचं नाही
वाट पाहूनी वर्षे सरली
कटाक्ष कधी पडलाच नाही
नयन दोन्ही आतुरलेले
स्पर्श ही तुझा झालाच नाही
रंध्रे माझी आक्रसलेली
ऊब मिठीची ती लाभलीच नाही
गात्रे राहिली सारी आसुसलेली
ओठ ते तुझे ऊमललेच नाही
चुंबने सारी मग विसरलेली
सलील तो स्त्रवलाच नाही
रसना म्हणून तहानलेली
भावना कधी कळल्याच नाही
प्रेम माझे तरीही आशेवरले

